सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 03:31 PM2021-06-25T15:31:16+5:302021-06-25T15:31:34+5:30

नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला.

Organic kitchen garden set up by women in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबाग

सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबाग

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्वला बावके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यात महिला समूहाच्या सहाय्याने विविध ठिकाणी सेंद्रिय पध्दतीच्या परसबागा तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध करुन देण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या परसबागांत लागवड करण्यासाठी गावरान वांगी, पालक, मेथी, भेंंडी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, कारली, घेवडा, वाल, शेपू, मिरची, आलू, कोरफड, वाल, पुदिना, फुलझाडे आदीसह विविध वाणांची लागवड करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक म्हणून जास्तीत जास्त परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीन जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कासारवाडी येथे शिला लोहकरे यांच्या शेतजमिनीत परसबाग अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुका व्यवस्थापक नितीन कापुरे, विजय कुटे, कस्तुरा गवारे, प्रभाग समन्वयक युवराज चव्हाण, अविनाश राठोड, ज्ञानेश्वर डावरे आदीसह महिला बचतगटाच्या सदस्य उपस्थित होत्या.

-----------------------------
गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, कुपोषण मुक्त कुटुंब यासाठी दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांंचा वापर व्हावा यासाठी परसबाग लागवड करणे आवश्यक आहे.

-नितीन कापुरे, तालुका व्यवस्थापक

Web Title: Organic kitchen garden set up by women in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक