संक्रांतीच्या वाणात लुटल्या सेंद्रिय खताच्या पिशव्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:42 PM2021-01-21T18:42:30+5:302021-01-21T18:44:01+5:30
मनमाड : मकर संक्रांत या सुवासिनींचा सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून सुवासिनींना बोलावून वाण स्वरूपात भेट वस्तु देत असतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी येथील महिलांनी संक्रातीच्या वाणात सेंद्रिय खताचा पिशव्या भेट दिल्या आहेत. या आगळ्या वेगळ्या वाणाची शहरात चर्चा रंगली आहे.

मनमाड येथील काकडे परिवारातील महिला सदस्यांनी आपल्या घरी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात आलेल्या सुवासिनींना एक आगळे वेगळे असे पर्यावरण पुरक सेंद्रिय खत वाण म्हणुन भेट दिले. हे खत त्यांनी आपल्या घरीच तयार केलेले असुन
परिसरातील झाडांचा जमा होणार पाला-पाचोळा, भाज्यांची साले व काड्या, उरलेले अन्न, शेण यापासुन हे खत तयार करण्यात आलेले आहे.
सर्वांनी आपल्या घरातील ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून अशा प्रकारच्या पर्यावरण पुर्वक जैविक खताची निर्मिती करून आपल्या घरातील बगिच्यातील झाडांना हे खत वापरावे असे अवाहन महिलांना करण्यात आले. यावेळी सुलभा काकडे, मयुरी काकडे, विनया काकडे, जयश्री काकडे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. (२१ मनमाड)