सेंद्रिय भाजीपाल्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:07 PM2019-01-19T23:07:54+5:302019-01-20T00:03:55+5:30
जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.
नाशिक : जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.
आरोग्यविषयक जनजागृतीच्या या उपक्रमाला नाशिक शहरातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय भाजीपाल्याबरोबर दूध, तूप आणि गूळ आणि धान्य सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेले असल्याने त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धावपळीच्या आणि ताणतणावाच्या बदलत्या जीवनशैलीत मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आहारात रासायनिक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला येत असल्याने वेगवेगळे आजार वाढत आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या पालेभाज्या व फळभाज्या खरेदीकडे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचा कल वाढला आहे.
जिल्ह्यातील काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवत असून, त्याचा दर तुलनेने जास्त असला तरी आरोग्यासाठी असलेल्या भाजीपाला खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता मुखेड, येवला, पिंपळगाव, वडनेर भैरव, बोराळे, वाडगाव, सिन्नर, धोंडबार, सोनारी, चांदवड आदी भागातील सुमारे ६0 शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी नाशिक येथे मुंबई नाका परिसरातील विक्रीसाठी आणत आहेत.
शहरातील विविध भागातील ग्राहक या ठिकाणी येऊन सेंद्रिय पालेभाज्या व फळभाज्या खरेदी करत आहेत.
४फळे, दूध, तूप, गूळ आणि धान्य हेदेखील सेंद्रिय पद्धतीनेच असल्याने त्याचीही खरेदी ग्राहक करीत आहेत. एकाच छताखाली सर्व भाजीपाला उपलब्ध असल्याने शेतकºयांना हमीभावदेखील चांगला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी प्रा. प्रभाकर मोराणकर यांनी स्वत:च्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे.