संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:07 AM2018-06-17T01:07:48+5:302018-06-17T01:07:48+5:30

संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले. 

Organizational power can change in educational field - Sachchidanand Joshi | संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

Next

नाशिक : संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे भारतीय  शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यावेळी उपस्थित होते.   समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले, तर कुलगुरू ई. वायुनंदन यांनी शिक्षण क्षेत्रात व्यावसायिकीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे भारतीय सत्व कमी होत आहे. समाजाची शिक्षणाशी असणारी नाळ तुटत असल्याने मूल्य नसलेले शिक्षण आज फोफावले आहे. या सर्व क्षेत्रात प्रचंड कार्य करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
मंडळाचे राष्टÑीय महामंत्री वामनरावजी गोगटे यांनी याप्रसंगी अहवाल सादर केला. प्रास्ताविक प्रांताध्यक्ष महेश दाबक यांनी केले. उमाशंकर पचोरी यांनी सूत्रसंचालन केले.  उद्घाटनानंतर संपन्न झालेल्या पहिल्या सत्रात पूर्ण मंडळ ते सुवर्णजयंती या विषयावर उद््बोधन करण्यात आले. या उपक्र माअंतर्गत २०२० पर्यंत भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शिक्षण मंडळाची शाखा स्थापना करणे, विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे शाखा सुरू करणे आणि पाच लाख सदस्य नोंदणी करणे या संकल्पाची मांडणी करण्यात आली. भारतभरातून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात वृत्त निवेदन आणि लेखन या विषयावर मुकूल कानिटकर आणि सच्चिदानंद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Organizational power can change in educational field - Sachchidanand Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.