दान मुर्ती संकलनासाठी सरसावल्या संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:42 PM2017-09-06T15:42:02+5:302017-09-06T15:42:25+5:30
नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरीस तसेच अन्य माती मिश्रीत मुर्त्या नदीपात्रात विसर्जन केल्यानंतर नदीपात्र दुषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत असते. पर्यावरणाला हानी पोहचू नये तसेच नदीपात्र दुषित होऊ नये यासाठी गंगाघाट, तपोवन, रामवाडी (गोदापार्क) आदिंसह मनपाने ज्या भागात दान मुर्ती संकलन केंद्र उभारले होते त्याठिकाणी दान मुर्ती स्विकारण्यासाठी पंचवटी तसेच शहरातील विविध संस्था सरसावल्या होत्या.
मुर्तीचे पाण्यात विसर्जन केल्याने पाणी दुषित होते शिवाय पर्यावरणाला हानी पोहचत असल्याने विविध संस्थांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी ज्या भागात मुर्ती विसर्जन करण्यात येत होत्या त्या भागात सकाळपासूनच तळ ठोकून होते. मुर्ती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना संस्थेचे पदाधिकारी मुर्त दान करण्याबाबत आवाहन करीत होते. काही संस्थेच्या पदाधिकाºयांनी मुर्ती दान करा, पर्यावरण वाचवा असे फलक तयार करून परिसरात उभारलेले होते.
मुर्ती दान करणाºया भाविकांना आवाहन केल्यानंतर भाविक गणेश मुर्ती पाण्यात बुडवून ती दान मुर्ती स्विकारणाºया संस्थांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडे देत होते. मुर्त दान करण्याच्या विविध संस्थेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. पंचवटीतील रामकुंड, गौरी पटांगण तसेच म्हसोबा महाराज पटांगणावर जवळपास २३ हजाराहून अधिक दान मुर्ती जमा झाल्या तर त्यापाठोपाठ तपोवनातील कपिला गोदावरी संगमाहून ६ हजारापेक्षा जास्त दान मुर्ती संकलन केल्या आहेत. विविध संस्थांनी जमा केलेल्या मुर्त मनपाच्या स्वाधीन केल्या आहेत. या दान मुर्त स्विकारण्यासाठी नाशिक मनपा, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थी कृती समिती, पंचवटी पोलीस ठाणे संवेदना फाऊंडेशन, मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज, मराठा विद्या प्रसारक संस्था आदिंसह विविध संस्था सरसावल्या होत्या.