सुश्राव्य कीर्तनाने रंगले ‘विशाल जम्मा जागरण’ सांस्कृ तिक कार्यक्रम : बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:11 AM2017-12-22T01:11:14+5:302017-12-22T01:12:16+5:30

नाशिक : सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती व्हावी तसेच विखुरलेला राजस्थानी मारवाडी समाज एकत्र यावा या उद्देशाने हनुमानवाडी लिंक रोड येथील श्रद्धा लॉन्स येथे गुरुवारी (दि. २१) नाशिकच्या बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे ‘विशाल जम्मा जागरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Organized 'Vishal Jamma Jagaran' cultural program organized by Sushruti Kirtan: Baba Ramdevji organizes devoteeship | सुश्राव्य कीर्तनाने रंगले ‘विशाल जम्मा जागरण’ सांस्कृ तिक कार्यक्रम : बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे आयोजन

सुश्राव्य कीर्तनाने रंगले ‘विशाल जम्मा जागरण’ सांस्कृ तिक कार्यक्रम : बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देरामदेवजी बाबा यांच्या जीवनावर आधारित विविध भजनेभाविकांनी भजनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला

नाशिक : सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती व्हावी तसेच विखुरलेला राजस्थानी मारवाडी समाज एकत्र यावा या उद्देशाने हनुमानवाडी लिंक रोड येथील श्रद्धा लॉन्स येथे गुरुवारी (दि. २१) नाशिकच्या बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे ‘विशाल जम्मा जागरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थान, रामदेवरा स्थित रामदेवजी बाबा कुलदैवत असलेल्या भक्तांनी गुरुवारी एकत्र येत विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत जागरण केले. यावेळी हैदराबाद येथील नामांकित गायक तथा स्वर्गीय गायक गोपाल बजाज यांचे पुत्र सुशील बजाज यांनी रामदेवजी बाबा यांच्या जीवनावर आधारित विविध भजने सादर केली. गेल्या अनेक वर्षांपासून सुशील बजाज यांच्या भजन कार्यक्रमांचे देशातील विविध राज्यांत नियमित आयोजन करण्यात येत असून, नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राजस्थानी मारवाडी असणाºया जैन, माहेश्वरी आणि ब्राह्मण यांनी एकत्र येत रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या या जम्मा जागरण कार्यक्रमात जवळपास तीन हजारांहून अधिक भाविकांनी भजनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी राजमल चोरडिया यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रसाद गौड, गणेश साखला, स्वप्नील खिवंसरा आणि बाबा रामदेवजी भक्तपरिवार, नाशिक यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्याअंतर्गत दुपारी २ वा. ११ जोडप्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली, यानंतर संध्याकाळी ५ वाजेपासून धार्मिक भजन कार्यक्रम आणि संध्याकाळी सहा, रात्री नऊ आणि १२ वाजता रामदेवजी बाबा यांची महाआरती करण्यात आली. सोहळ्याप्रसंगी बाबा रामदेवजी यांचा पेहराव करून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली आणि रात्री १२ वाजता पाळणा महोत्सवाने या जम्मा जागरण महोत्सवाची सांगता करण्यात आली.

Web Title: Organized 'Vishal Jamma Jagaran' cultural program organized by Sushruti Kirtan: Baba Ramdevji organizes devoteeship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक