साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:47 AM2021-02-24T01:47:16+5:302021-02-24T01:47:30+5:30

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.

The organizers hope that Corona's status will be restored by the time of the literary convention; Prepare vigorously | साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

Next

नाशिक : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आयोजकांनी तूर्तास वेट ॲण्ड वॉच, अशी भूमिका घेतली आहे. संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी असून, तोपर्यंत परिस्थिती निवळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. 

गेल्या काही दिवसांत कोराेना बाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी झाला असून, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदी देखील लागू केली आहे. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी भुजबळ व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना संमेलनाचे निमंत्रक आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.  

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.  अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यांचा कालावधी आहे. शासनाचे धोरण व नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे जातेगावकर यांनी सांगितले. 

Web Title: The organizers hope that Corona's status will be restored by the time of the literary convention; Prepare vigorously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.