कार्तिक पौर्णिमेनिमित्त महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:48 AM2018-11-21T01:48:46+5:302018-11-21T01:49:04+5:30
नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचवटी: नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कार्तिकस्वामींच्या पूजनाने महोत्सवाला सुरुवात होईल.
गुरुवारी कार्तिकस्वामीचे पूजन, अभिषेक करून महाआरती करण्यात येईल. दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत असून, शुक्रवारी सकाळी ११ वाजून ९ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी कृत्तिका नक्षत्र सुरू होत असून, शुक्रवारी दुपारी ४ वाजून ४१ पर्यंत कृत्तिका नक्षत्र असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने या दिवशी देवाला मोरपीस अर्पण करण्याची प्रथा आहे.