सटाण्यात मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त शिबीराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:56 PM2021-02-02T20:56:31+5:302021-02-03T00:17:15+5:30
सटाणा : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस व मराठी भाषा पंधरवडानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संत साहित्याचे अभ्यासक तसेच मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.
Next
यावेळी धोंडगे यांनी मराठी भाषेचा इतिहास, महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषेतून ग्रंथ संपदा लिहून मराठी भाषा अधिक प्रभावी व समृध्द करुन तिचे महत्त्व कसे वाढवले या विषयावर मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश ए.जी. तांबोळी यांनी राष्ट्रीय मतदारदिना विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विक्रम आव्हाड यांनी मराठी भाषा समृध्दीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमास वकील फेडरेशन तथा सटाणा वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, सचिव ॲड. आर. एम. जाधव, ॲड. एस. व्ही. मुंजवाडकर, ॲड. एस.आर. सोनवणे, ॲड. पी.डी. भामरे आदी उपस्थित होते.