गणित माझा सोबती स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:44+5:302020-12-05T04:23:44+5:30
सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी आहेत. केवळ नववी ते बारावीचे वर्ग काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे शाळेत ...
सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी आहेत. केवळ नववी ते बारावीचे वर्ग काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे शाळेत यंदा गणितविषयक विविध उपक्रम घेता येणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी घरून सहभाग घेऊ शकणार आहेत.‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर दोन गटांत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे प्रकल्पनिहाय आणि अपर आयुक्तालयानिहाय शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी आश्रमशाळा या प्रकारानिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर मात्र प्रथम, द्वितीय आणि तृतीय याव्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
चौकट -
स्पर्धेचे वयोगट आणि विषय
गट पहिला- इयत्ता पाचवी ते आठवी : ‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर चित्र सादर
करावयाचे आहे.
गट दुसरा- इयत्ता नववी ते बारावी : ‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर निबंध सादर करावयाचा आहे. शब्दमर्यादा २५० ते ३०० शब्द.
आणि निबंध दिनांक १० डिसेंबर पर्यंत सादर करावयाचे आहेत.
‘