सावरकर जयंती निमित्त ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:05+5:302021-05-23T04:14:05+5:30
या मोहिमेंतर्गत सावरकरांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या भगूरमधील विविध ठिकाणांना भेटी देऊन भगूरमध्ये आलेल्या सावरकर प्रेमींना त्या ठिकाणांचे महत्त्व सांगितले ...
या मोहिमेंतर्गत सावरकरांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या भगूरमधील विविध ठिकाणांना भेटी देऊन भगूरमध्ये आलेल्या सावरकर प्रेमींना त्या ठिकाणांचे महत्त्व सांगितले जाते. २८ मे रोजी हा दिवसभराचा कार्यक्रम असतो. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षी भगूरमध्ये मोहिमेसाठी येणाऱ्या सावरकर प्रेमींची निराशा होऊ नये म्हणून समूहातर्फे यावर्षी फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन भगूर दर्शन मोहीम दाखविली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे सावरकर प्रेमींना भगूरमध्ये येणे शक्य नसल्याने त्यांची निराशा होऊ नये म्हणून गेल्या वर्षी देखील अशी क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती व त्यास भारतभरातून ४५०० सावरकर प्रेमींनी प्रतिसाद दिलेला होता. या वर्षी देखील अशा प्रकारची क्लिप तयार करून प्रसारित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे समूहातर्फे आवाहन करण्यात आले आहे.