संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:12 AM2018-05-06T00:12:13+5:302018-05-06T00:12:13+5:30
येवला : संस्कृत भाषा प्रचार आणि प्रसारासाठी येवल्यात संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने माधवी देशपांडे यांनी दिली आहे.
येवला : संस्कृत भाषा प्रचार आणि प्रसारासाठी येवल्यात संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने माधवी देशपांडे यांनी दिली आहे. सोनार गल्लीतील जयश्री किशोर जोशी यांच्या निवासस्थानी असणाऱ्या एका हॉलमध्ये १४ ते २३ मेपर्यंतच्या कालावधीत सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान आयोजित केलेले संस्कृत अध्यापक सुषमा भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपूर्णपणे नि:शुल्क आहे. या शिबिरासाठी वयाची व संस्कृतच्या पूर्वज्ञानाची अट नाही. या शिबिरातील सहभागासाठी जयश्री जोशी (सोनार गल्ली) यांनी नावे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. संस्कृतभारती ही संस्था देशात आणि विदेशात संस्कृतभाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन आणि प्रशिक्षणाचे काम करते.