रासायनिक खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:01+5:302021-05-17T04:13:01+5:30
शेतकरी बांधवांकडून युरिया रासायनिक खताचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता यावर विपरित परिणाम होतो. सुपीकता अबाधित राहावी व ...
शेतकरी बांधवांकडून युरिया रासायनिक खताचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता यावर विपरित परिणाम होतो. सुपीकता अबाधित राहावी व पिकांना गरजेनुसार अन्नद्रव्य मिळावे यासाठी ठराविक कालावधीने मातीचा नमुना तपासून जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांच्या वापराबाबत उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दहा टक्के रासायनिक खतांची बचत व्हावी म्हणून युरिया या खताचा एकदाच वापर न करता टप्प्या-टप्प्याने वापर करणे, जैविक खतांची पेरणीवेळी बीजप्रक्रिया करणे, सेंद्रिय खते व हिरवळीच्या खतांचा जसे ताग, धैंचा इत्यादींचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे, रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांच्या बचतीसाठी व खतांच्या कार्यक्षम वापरासाठी सदर मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया-
दहा टक्के रासायनिक खताच्या बचतीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांच्या वापराबाबत तसेच जैविक बीज प्रक्रियेबाबत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली जात आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खतांची मात्रा परिगणित करण्यासाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
-विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, चांदवड