संस्कृती वैभवच्या वतीने त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:57 AM2018-12-08T00:57:52+5:302018-12-08T00:58:09+5:30
यंदाचे वर्ष ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके, प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी व गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने या निमित्ताने संस्कृती वैभवतर्फे तीन दिवसीय त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी महोत्सव दि. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे.
नाशिक : यंदाचे वर्ष ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके, प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी व गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने या निमित्ताने संस्कृती वैभवतर्फे तीन दिवसीय त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी महोत्सव दि. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे.
संस्कृती वैभवच्या वतीने आयोजित या महोत्सवात बाबूजी, गदिमा आणि पु.ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची विशेष उपस्थिती असेल. या तीन दिवसीय महोत्सवात श्रीधर फडके गीत रामायण सादर करणार आहेत.
तसेच राजदत्त यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना संस्कृती वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे बाबूजी, गदिमा आणि पु. ल. देशपांडे या तिघांवर आधारित अक्षर त्रिवेणी या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती संस्कृती
वैभवचे खजिनदार रवींद्र देवधर यांनी दिली.