द्वारका चौकाची मूळ ओळख आता काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:35+5:302021-01-22T04:13:35+5:30

शहरातील जुन्या काळातील अनेक पाऊल खुणा हा त्या भागातील घर, बंगले अथवा व्यावसायिक इमारतींंमुळे रूढ झाल्या. शालिमार चौक हा ...

The original identity of Dwarka Chowk is now behind the curtain of time | द्वारका चौकाची मूळ ओळख आता काळाच्या पडद्याआड

द्वारका चौकाची मूळ ओळख आता काळाच्या पडद्याआड

Next

शहरातील जुन्या काळातील अनेक पाऊल खुणा हा त्या भागातील घर, बंगले अथवा व्यावसायिक इमारतींंमुळे रूढ झाल्या. शालिमार चौक हा असाच शालिमार हॉटेलमुळे सुपरिचित शहरातील जीपीओजवळील किटकॅट चौक किंवा इंदिरानगरातील बापूबंगला, सातपूर वसातीतील जुनी कांदा फॅक्टरी अशा अनेक चौक किंवा मार्ग हे त्या भागातील वास्तुंमुळे सहज खूण म्हणून ओळखले जात. सध्या एबीबी सर्कल असलेला त्र्यंबकरोडचा चौकदेखील पूर्वीदेखील पोल्ट्री फार्म नावाने बसथांबा होता. अशा अनेक ओळखी बदलल्या जात आहेत. त्यात आता द्वारका चाैकातील द्वारका हॉटेलच्या बाबतीत होत आहे. काही दिवसांपासून या हॉटेलचे पाडकाम सुरू आहे. साठच्या दशकातील हे हॉटेल साताऱ्यातील हॉटेल व्यावसायिक श्यामराव शानबाग यांनी बांधले. त्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री बाळासाहेब देसाई यांनी त्यांना आग्रह केला आणि हे हॉटेल सुरू झाले. त्यापूर्वी हा देवळाली नाका म्हणूनही हा चौक परिचित होता.

द्वारका हॉटेल ही या चौकाची ओळख बनली. दाट झाडी आणि कचरा असलेल्या या हॉटेलमुळे परिसराचा स्वरूप बदलले. आजूबाजूच्या ठिकाणी नवीन इमारती, व्यापारी संकुले तयार झाल्या. हे हॉटेल अनेकांसाठी गप्पांचा कट्टा ठरले. त्या काळात नाशिकमध्ये बॉलिवुडमधील अनेक तारक-तारकांनी या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. पहिले सुपररस्टार राजेश खन्नादेखील या ठिकाणी वास्तव्यास होते असेही अनेकांना स्मरते. आता हे हॉटेल पाडले गेले तरी त्याच्या आठवणी अनेकांच्या स्मरणात राहणार आहेत.

इन्फो..

वाहतुकीमुळे गाजलेला चौक

पूर्वी केवळ चौफुली असलेला हा चौक वाहतुकीच्या अनेक कारणांनी गाजला आहे. उड्डाण पूल नसताना या ठिकाणी अशोका सर्कल वाहतूक बेट होते. १९९२ ते ९६ दरम्यान ने हटविण्याची चर्चा तत्कालीन महापालिकेत आणि माजी आमदार (कै.) गणपराव काठे करत असता. महामार्ग विभागाच्या ताब्यातील बहुतांश रस्ते असल्याचे द्वारका चौफुलीचे काय करायंचे? असा प्रश्न अनेक अनेक वर्षे गाजला.

इन्फो..

टीओडीमुळे बदलणार स्वरूप

लहान-मोठे तब्बल सतरा रस्ते एकत्र येणारा हा चौक आहे. सध्या मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाण पूल झाल्या आणि भुयारी पादचारी पूल तयार झाला. आता याच ठिकाणी द्वारका चौफुलीच्या परिसरात बाजूलाच महापालिकेच्य आरोग्याधिकाऱ्यांचा बंगला तेाडून तेथे व्यापारी संकुल व महापालिकेचे विभागीय कार्यालय बांधण्यात येणार आहे, तर या भागातून निओ मेट्रो सुरू झाल्यानंतरदेखील टीओडी (ट्रांझिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) अंतर्गत शंभर मीटर क्षेत्रात ज्यादा एफएसआय मिळणार असल्याने हा चौक आणखी बदललेला दिसेल.

-----------

छायाचित्र प्रशांत खरोटे

Web Title: The original identity of Dwarka Chowk is now behind the curtain of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.