अनाथ मुलांच्या संगोपनासाठी ऑरफन वेल्फेअर ट्रस्ट सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:50+5:302021-06-02T04:12:50+5:30
कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. तर काहींच्या घरातील ...
कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. तर काहींच्या घरातील आई-वडिलांचा यात दुर्दैवी मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे अनेक कुटुंबातील लहान मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ती मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे अशा अनाथ झालेल्या मुलांचे, तसेच आई-वडिलांमुळे पोरके झालेल्या मुलांचे आयुष्य पुन्हा तेजोमय व्हावे व त्यांना मायेचा आधार मिळावा, यासाठी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून या मुलांच्या पुढील आयुष्याचा सर्व खर्च करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात आई-वडिलांपासून पोरके झालेल्या मुलांना त्यांच्या नातेवाइकांकडे देऊन त्यांची शैक्षणिक तसेच इतर सर्व खर्च करण्याची तयारी ट्रस्टने हाती घेतली आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील ५०० मुलांचे या माध्यमातून संगोपन करण्यात येणार असून, यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रात ट्रस्टच्या माध्यमातून पोरके झालेल्या मुलांना सांभाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही प्रताप दिघावकर व धनंजय बेळे यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे सचिव अभिषेक बोडके, खजिनदार रवींद्र अहिरे, डॉ. अतुल वडगावकर, मृणाल जोशी, सपना राणे, दीपक पवार, प्रज्ञा पाटील, निखिल पांचाल, ललित बूब आदि उपस्थित होते.
कोट===
कोरोना महामारीमुळे अनेक मुले पोरकी झाली आहेत. त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आई-वडील गमावलेल्या अनेक मुलांची जबाबदारी सध्या मी घेत असून, या ट्रस्टच्या माध्यमातूनदेखील अशा मुलांचा सांभाळ करणार आहे.
-डॉ. अतुल वडगावकर.