अनाथ विद्यार्थिनीला मिळाले पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 09:51 PM2020-01-16T21:51:20+5:302020-01-17T01:25:38+5:30
खडतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या प्रगती माध्यमिक विद्यालयातील रेणुका दिलीप खैरनार या होतकरू विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारून इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी रेणुकाला मातृत्व देत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे.
सटाणा : खडतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या प्रगती माध्यमिक विद्यालयातील रेणुका दिलीप खैरनार या होतकरू विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारून इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी रेणुकाला मातृत्व देत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे.
इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या वर्धापन दिनानिमित्त प्रगती विद्यालयात विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्मिता येवला, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण येवला, शिक्षणाधिकारी पी. पी. महाजन, समको बँकेच्या माजी अध्यक्षा रूपाली कोठावदे, सचिव रूपाली जाधव, मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे, अतुल अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती येवला यांनी रेणुकाचे फक्त शैक्षणिकदृष्ट्या पालकत्व स्वीकारत नसून तिला वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. सचिव रूपाली जाधव, रामकृष्ण येवला यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मास क्लबच्या सदस्य संगीता खानकरी, रु पाली निकुंभ, रेखा वाघ, सुजाता पाठक, पूनम अंधारे, रूपाली पंडित, साधना पाटील, रंजिता मोरे, योगीता देवरे, सुनीता धोंडगे, एम. टी. म्हसदे, एन. एम. सोनजे, के. ए. गुंजाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. पी. केदारे यांनी तर श्रीमती व्ही. झेड. भामरे यांनी आभार मानले.
इयत्ता नववी व दहावीपर्र्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व
आई-वडील नसलेल्या रेणुकाचे इयत्ता नववी व दहावीपर्र्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व क्लबच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी स्वीकारून मातृत्व मिळवून दिले. पाच वर्षांपूर्वी अपघातामध्ये रेणुकाचे वडील तर आजारपणामुळे तिच्या आईचे निधन झाले आहे. सध्या ती कोटबेल (ता.बागलाण) येथील बहिणीकडे वास्तव्यास आहे. शाळेकडून रेणुकाला शिक्षणासाठी वेळोवेळी मदतही केली जात असते.