इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:07 PM2020-10-08T23:07:55+5:302020-10-09T01:16:30+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवगार्तील गरजू स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्'ातील इतर मागासवर्ग प्रवगार्तील सुशिक्षित बेरोजगार, होतकरू व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळातर्फे असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवगार्तील तसेच नाशिक जिल्'ातील रहिवाश्यानांच मिळणार आहे. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसून त्याचा सिबिल स्कोर ५०० पेक्षा जास्त असावा; अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्यास ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
गरजू यक्तीनी जिल्हा कार्यालयात किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३/२२३६०७३ या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने केले आहे