...अन्यथा भाजपाची मनसे होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:05 AM2017-09-03T01:05:16+5:302017-09-03T01:05:29+5:30
महापालिकेचा कारभार हाकणाºया सत्ताधारी भाजपातील पदाधिकाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परस्पर निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करत खरडपट्टी काढली. महापालिकेतील कारभार सुधारा अन्यथा भाजपाचीही मनसे होईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यापुढे महापालिकेच्या कारभारात स्वत: लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक : महापालिकेचा कारभार हाकणाºया सत्ताधारी भाजपातील पदाधिकाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परस्पर निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करत खरडपट्टी काढली. महापालिकेतील कारभार सुधारा अन्यथा भाजपाचीही मनसे होईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यापुढे महापालिकेच्या कारभारात स्वत: लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.
महापालिका नगरसेवकांसह पदाधिकाºयांची बैठक भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संघटनात्मक प्रकल्पांवर चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित पदाधिकाºयांच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल कान उपटले. महाजन यांनी सांगितले, पदाधिकाºयांच्या कारभारात एकवाक्यता नाही, समन्वय नाही. पार्टीला विचारात न घेता परस्पर ठराव, निर्णय घेतले जातात. आपसातही मोठ्या प्रमाणावर सुंदोपसुंदी आहे. नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याने सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. पदाधिकारी व नगरसेवक यांच्यातही समन्वयाचा अभाव आहे. पदाधिकाºयांसह नगरसेवकांनी मनसेपासून धडा घेतला पाहिजे. कारभारात सुधारणा झाली नाही, तर भाजपाचीही मनसे व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही महाजन यांनी दिला. तत्पूर्वी, पार्टीच्या बैठकांना नगरसेवक हजर राहत नसल्याबद्दल झाडाझडती घेण्यात आली, तसेच संघटनात्मक पातळीवर राबविल्या जाणाºया उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.