...नाहीतर मी खड्डे भरतो : नरहरी झिरवाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:12 AM2018-08-26T01:12:55+5:302018-08-26T01:13:24+5:30
: तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत तत्काळ भरा अन्यथा मी स्वत:च खड्डे भरतो, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान गुरुवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले.
दिंडोरी : तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत तत्काळ भरा अन्यथा मी स्वत:च खड्डे भरतो, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान गुरुवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. शनिवारी (दि. २५ ) दिंडोरी तहसील कार्यालयात दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत रस्त्यावरील खड्डे वेळच्या वेळी का भरले जात नाहीत, याबाबत जाब विचारण्यात आला. येत्या गुरु वारपर्यंत खड्डे भरले गेले नाही तर मी कार्यकर्त्यांसह स्वत: हातात पाटी-फावडे घेऊन खड्डे भरेल, असा इशारा झिरवाळ यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनीदेखील अधिकाºयांना धारेवर धरत खड्डे तत्काळ भरण्याच्या सूचना दिल्या. दिंडोरी कृउबाचे सभापती दत्तात्रय पाटील, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, राकॉँ तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, रायुकॉँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, विलास कड, पेठचे नगरसेवक गणेश गावित रायुकॉँ तालुकाध्यक्ष गिरीश गावित यांनी देखील आपापल्या परिसरातील रस्त्यांचे प्रश्न मांडले. सर्वतोपरी प्रयत्न करून सर्व खड्डे तत्काळ भरण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. कंकरेजा यांनी दिले. यावेळी तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पेठचे तहसीलदार भामरे, बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, तौसिफ मनियार, पेठचे नगरसेवक गणेश गावित, रायुकॉँ तालुकाध्यक्ष गिरीश गावित आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कंकरेजा, उपअभियंता भामरे, मराठे, प.सं.चे देवरे व इतर अभियंता उपस्थित होते.
आमदार आक्र मक
आमदार नरहरी झिरवाळ मितभाषी व शांत स्वभावाचे म्हणून परिचित आहेत. मात्र शनिवारी मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था व त्यावर अधिकाºयांचे गोलमोल उत्तरे यावरून झिरवाळ यांचाही संयम सुटला. त्यांनी आक्र मक होत अधिकाºयांना सक्त सूचना देत काम होणार की नाही हे सांगा, काम कसे करायचे हे मला माहीत आहे, असे सांगत कानपिचक्या दिल्या.
पंचायत समितीच्या अंतर्गत येणाºया बांधकाम विभागांतर्गत झालेल्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात तक्र ारी करण्यात आल्या. निविदेप्रमाणे कामे न करता बिले अदा केल्याच्या तक्र ारी करण्यात आल्या.