अन्यथा पोलिसी खाक्या दाखवावा लागू शकतो भुजबळ : विनाकारण गर्दी करणा-यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:05 PM2020-04-03T18:05:18+5:302020-04-03T18:33:39+5:30
नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये मुख्य बाजारातील अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी ते बाजार पेठेत आले होते. शहरातील अति संवेदनशील भाग समजला जाणारा जुने नाशिक आणि वडाळा गावचा परिसर अद्यापही शासकीय नियमांचे आदेश पाळताना दिसत नाही. नागरिक खुलेआम गर्दी करताना दिसत असून याठिकाणी नागरिक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवला तरच सर्व ठिकाणावर येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जो ऐकणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रोगाला समोरे जावे लागेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
इन्फो
बाजारपेठेचा आढावा
संचारबंदीच्या काळात अन्न धान्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा खाते लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून या खात्याचे मंत्नी छगन भुजबळ यांनी मध्यवर्ती असलेल्या बाजार पेठेत येऊन किराणा दुकानदारांशी संवाद साधत आढावा घेतला. एप्रिल महिन्यात पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी कधीही झुंबड करण्याची आवश्यकता नसल्याचे भुजबळ त्यांनी सांगितले.