...अन्यथा 31 मे पासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:58 PM2020-05-27T21:58:50+5:302020-05-27T21:59:31+5:30
तामिळनाडू मध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे.
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याच बरोबर अन्य मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 31 मे पासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच 1 जून पासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोना वायरसमुळे ५ दुकानदाराचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या रेशन दुकानदारांचा ५० लाखाचा विमा संरक्षण द्यावे तसेच एप्रिल, मे, जून महिन्यासाठी मोफत दिलेले तांदुळ व दाळ विक्रीचे कमिशन त्वरित देण्यात यावे, सर्व दुकानदार व मदतनीस यांना कोरोना संरक्षण किट दयावे, जो पर्यंत कोरोनाचा पुर्णपणे नायनाट होत नाही तो पर्यंत कार्डधारकांचे इ पॉश मशीनवरचा अंगठा न घेता त्याच्या नॉमिनीचा अंगठा घेण्याचा आदेश देण्यात यावा,
तामिळनाडू मध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 31 मे पासून एकही दुकानदार धान्य उचलण्यासाठी चलन भरणार नाही त्याच बरोबर 1 जून पासून धान्य वितरित करणार नसल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. दुकानदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे,
शेख निसार, जितू पाटील, भगवान आढाव, किरण काथे, रविंद्र पगारे, एकबाल खान, पद्माकर पाटील, प्रवीण शेवाळे आदींनी केले आहे.