ओटीएस कर्जमाफी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:50+5:302021-09-02T04:31:50+5:30
करण्यासाठी तहसीलदाराना निवेदन मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ व्हावी या मागणीचे निवेदन येवला तालुका स्वाभिमानी ...
करण्यासाठी तहसीलदाराना निवेदन
मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ व्हावी या मागणीचे निवेदन येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येवला तालुका तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले आहे.
राज्य सरकारने दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली असताना अनेक शेतकऱ्यांनी या वन टाइम सेटलमेंट योजनेत सहभागी होऊन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले कर्ज भरलेले असताना देखील अद्यापही ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.
शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर या कर्जाच्या बोजाच्या नोंदी असल्याने इतर कोणत्याही बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत एक रुपया देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.
निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी नाशिक प्रमुख श्रावण देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अध्यक्ष किरण बारे, प्रभाकर गरुड आदी उपस्थित होते.
(वन टाइम सेटलमेंट कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी)