ओतुरची ग्रामसभा विविध प्रश्नावर गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:16 PM2019-05-29T19:16:56+5:302019-05-29T19:17:22+5:30
ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर येथील ग्रामपंचायतीने घेतलेली विशेष ग्राम सभा विवीध विकास कामांच्या प्रश्नांवर गाजली.
ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर येथील ग्रामपंचायतीने घेतलेली विशेष ग्राम सभा विवीध विकास कामांच्या प्रश्नांवर गाजली.
सदर सभेस विशेष म्हणजे ९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सरपंच शांताराम पवार, सदस्य दादाजी मोरे व निर्मला घोलप हे तीनच सदस्य उपस्थित होते, तर उपसरपंच कल्पना देसाई, सदस्य दादाजी सूर्यवंशी, मोतीराम मोरे, अहिल्या गांगुर्डे, मिना आंबेकर, संगिता बागुल आदी सहा सदस्य गैरहजर होते. कोरम पुर्ण नसतानीही ग्रामस्थांच्या आग्रहामुळे ग्राम सभा घेण्यात आली. सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक के. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.
सदर ग्रामसभेत विवीध प्रश्नावर चर्चा झाली, तयात पुढील ठराव करण्यात आले.
गावातील पाणी टंचाई दुर करणे, सहा सदस्य गैरहजर राहिल्याने पंचायत बरखास्त करणे असे दादा मोरे यांनी सांगितले. गावातील कॉँक्रीटीकरण, स्मशानभुमी,गावातील पेयजल पाणीपुरवठा कामे, गावातील गटार कामे आदींची चौकशी करणे, धरणातील अवैध मोटरी बंद करणे, गावठाण हद्दीतील अतिक्र मण काढणे या सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.
सदर बैठकीतील चर्चेत दादा मोरे, रमेश रावले, अशोक देशमुख, देवा भुजाडे, डॉ. पंकज मेणे, समाधान देवरे, शहाबान पठाण, नागेश मोरे, उत्तम पवार यांनी सहभाग घेतला.
सदर सभेस दत्ता सोनजे, योगेश सोनवने, राजु गवळी, जिभाऊ जाधव, प्रभाकर पवार, भाऊसाहेब मोरे, ज्ञानेश्वर पवार, कैलास भुजाडे, सजन अहिरे, दिपक गायकवाड, भगवान मोरे, प्रकाश सोनजे, बाळकृष्ण देशमुख, मधुकर देवरे, सुरेश घोलप, हरीभाऊ पगार, दत्तु मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.