पीएम केअर फंडातून मिळालेल्या २८५ व्हेंटिलेटर्सपैकी ११ पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:21+5:302021-05-13T04:14:21+5:30

नाशिक : पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला एकूण २८५ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले होते. त्यातील ६० व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयात असून अन्य ...

Out of 285 ventilators received from PM Care Fund, 11 fell! | पीएम केअर फंडातून मिळालेल्या २८५ व्हेंटिलेटर्सपैकी ११ पडून !

पीएम केअर फंडातून मिळालेल्या २८५ व्हेंटिलेटर्सपैकी ११ पडून !

Next

नाशिक : पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला एकूण २८५ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले होते. त्यातील ६० व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयात असून अन्य व्हेंटिलेटर्स सर्व तालुक्यांतील रुग्णालयांमध्ये वितरित करण्यात आले आहेत;मात्र तंत्रज्ञांअभावी त्यातील ११ व्हेंटिलेटर्स सध्या बंदच असल्याचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे; मात्र प्रत्यक्षात यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही व्हेंटिलेटर्सची अद्याप कुणालाच माहिती नसल्याने जिल्ह्याला प्राप्त व्हेंटिलेटर्सचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्सची गरज लक्षात घेता मागील वर्षी पीएम केअर फंडातून नाशिक जिल्ह्याला एकूण २६०, तर चालूवर्षी २५ व्हेंटिलेटर्स मिळालेले आहेत. यामधील ६० व्हेंटिलेटर्स जिल्हा शासकीय रुग्णालयात असून, उर्वरित तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार त्यातील ११ व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याने पडून आहेत. व्हेंटिलेटर्स असले तरी त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तसेच एमडी डॉक्टरांची वानवा आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर्स असूनही त्याचा वापर करण्यास अडचणी उत्पन्न होतात. तालुक्यांसाठी देण्यात आलेले काही व्हेंटिलेटर्स जिल्हा शासकीय रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले.

मालेगावात २७ व्हेंटिलेटर्स

गेल्यावर्षी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. ही हतबलता लक्षात घेऊन शासनाने मालेगाव शहराकडे विशेष लक्ष पुरवत गेल्या वर्षभरापासून ५८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. या ५८ व्हेंटिलेटर्सपैकी २७ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून उपलब्ध झाले आहेत. सद्यस्थितीत ५८ पैकी २२ व्हेंटिलेटर्स महापालिकेला तर २७ व्हेंटिलेटर्स सामान्य रुग्णालयात उपलब्ध आहेत. तर काही व्हेंटिलेटर्स खासगी व नांदगावच्या शासकीय रुग्णालयाला देण्यात आले आहेत. सामान्य रुग्णालयाला २२ व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे. परिणामी उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्समुळे रुग्णांना जीवदान मिळत आहे. ५८ पैकी २ व्हेंटिलेटर्समध्ये बिघाड झालेला आहे. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कळवणला ११ पैकी दोन नादुरुस्त

कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाला खासदार भारती पवार यांनी पीएम केअर फंडातून दहा व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी चार व्हेंटिलेटर्स नाशिक जिल्हा रुग्णालयात दिले असून, उर्वरित अकरा व्हेंटिलेटर्सपैकी चार मानूर कोविड सेंटरमध्ये, तर पाच कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित आहेत. त्यातील दोन व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याने बंद आहेत. पीएम केअर फंडातून उपजिल्हा रुग्णालयास हे पंधरा व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते. कळवण तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर्सची गरज असल्याने चार व्हेंटिलेटर्स मानूर येथील कोविड सेंटरला देण्यात आले आहेत. पाच व्हेंटिलेटर्स उपजिल्हा रुग्णालयात असून, उर्वरित दोन व्हेंटिलेटर्स बंद असल्याने कार्यान्वित नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांनी दिली.

वणीचे नाशिकला हस्तांतरित

तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयाला मागील वर्षी एक व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून मंजूर करण्यात आला होता, परंतु या ठिकाणी व्हेंटिलेटर चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सदर व्हेंटिलेटर हे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सद्यस्थितीत या ठिकाणी एकही व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला नाशिकला उपचारासाठी न्यावे लागते.

कोट.....

मागील वर्षी आणि यंदाही पीएम केअर फंडातून जिल्ह्याला व्हेंटिलेटर्स देण्यात आलेले आहेत. त्यातील काही तालुक्यांना वाटलेले आहेत; परंतु अनेक ठिकाणी ते ऑपरेट करणारा कर्मचारीवर्ग नाही. काही तालुक्यांचे व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले आहेत. ते ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन पुन्हा तालुक्यातील रुग्णालयांना मिळाले पाहिजेत. साधनसामग्री आपल्या हाती असूनही त्याचा वापर होत नाही, याची खंत वाटते.

- डॉ. भारती पवार, खासदार

कोट

जिल्ह्याला पी. एम. केअर फंडमधून प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ११ व्हेंटिलेटर्स विभिन्न कारणांमुळे बंद आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे बंद असलेल्या व्हेंटिलेटरना सुरु केले जाईल;मात्र अन्य व्हेंटिलेटर्स योग्यप्रकारे कार्यरत आहेत.

डॉ. अशोक थोरात,

फोटो

08 एम.एम.जी.7-चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले व्हेंटिलेटर.

--------------------------

ही डमी आहे.

Web Title: Out of 285 ventilators received from PM Care Fund, 11 fell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.