लोकअदालतीत 4851 खटले निकाली

By admin | Published: December 14, 2014 02:03 AM2014-12-14T02:03:38+5:302014-12-14T02:04:03+5:30

लोकअदालतीत 4851 खटले निकाली

Out of 4851 cases disposed of | लोकअदालतीत 4851 खटले निकाली

लोकअदालतीत 4851 खटले निकाली

Next

  नाशिक : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित आठ हजार व दावा दाखल पूर्व तीस हजार प्रकरणांपैकी ४८५१ दावे सामोपचाराने निकाली काढण्यात आले़ त्यामध्ये न्यायालयातील २८७१, तर दावा दाखल पूर्व १९८० प्रकरणांचा समावेश आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला फलके-जोशी यांच्या हस्ते झाले़ राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी आठ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती़ तर दावा दाखलपूर्व प्रकरणांची संख्या तीस हजार होती़ यापैकी न्यायालयातील २८७१ तर दावा दाखलपूर्व १९८० प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढण्यात आली़ बँक व दूरध्वनी कंपन्यांची ३ कोटी ४० लाख ७ हजार ६६४ रुपयांची वसुली झाली असून, मोटार अपघात प्रकरणातील पीडितांना ६ कोटी २० लाख ७८ हजार ९९५ रुपयांची भरपाई मिळाली़, तर फौजदारी प्रकरणातील दंडापोटी शासनाला ४ लाख ९७ हजार ९३० रुपयांचा महसूल मिळाला़ राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्'ातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे,वकील, पक्षकार व नाशिक जिल्'ातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले़(प्रतिनिधी)

Web Title: Out of 4851 cases disposed of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.