आदिवासी वसतिगृहात मुलींकडून नियमबाह्य पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 06:23 PM2018-10-05T18:23:39+5:302018-10-05T18:25:23+5:30
येवला येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत असल्याची तक्र ार मुलींनी केली आहे. त्रस्त मुलींनी बुधवारी नाशिकच्या दिशेने पायी मोर्चा काढला होता.
येवला : येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत असल्याची तक्र ार मुलींनी केली आहे. त्रस्त मुलींनी बुधवारी नाशिकच्या दिशेने पायी मोर्चा काढला होता. त्या दहा किमीवर पोहोचल्याच्या दरम्यान वरिष्ठांनी धावपळ करत येऊन मुलींची समजूत घातली.पायी चालल्याने दोन मुलींची प्रकृती खालावली.
येवल्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील अधिक्षक या मुलींकडून पैसे गोळा करून त्यातून झाडू, फिनेल तसेच स्वत:चा मोबाईल रिचार्ज करत असल्याचे वसतिगृहातील मुलींनी सांगितले. शासनाकडून जर आदिवासी मुलींसाठी अनेक सवलती दिल्या जात असताना शिक्षणासाठी परगावी राहणाऱ्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात असा प्रकार घडत असेल तर तो नक्कीच आदिवासी मुलीवर अन्यायकारक आहे. शासनाकडून जर वसतिगृहासाठी अनुदान येते तर मग तो पैसा जातो कुठे असा सवाल मुलींनी केला. सदरची घटना समजताच आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी येवला येथे येऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी तेथील मुलींनी त्यांचे पुढे तक्र ारीचा पाढा वाचला. त्यावरून अधिकाºयांनी घटनेस दुजोरा देऊन हे नियमबाह्य कृती असल्याचे सांगत वसतिगृहातील अधिक्षकांनी मुलींचे गोळा केलेले पैसे मुलींना तात्काळ परत केले जातील असे सांगितले.