नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 05:52 PM2018-10-28T17:52:42+5:302018-10-28T17:52:49+5:30

जायखेडा : गावातील नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्विरत बंद व्हावेत व नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवावा. यासाठी जायखेडा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रु ग्णांना आपआपल्या पॅथी नुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल असा सूचना वजा इशारा सरपंच शांताराम अहिरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

Out-of-date medical businesses should be closed immediately | नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत

नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत

Next
ठळक मुद्देजायखेडा : ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक

जायखेडा : गावातील नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्विरत बंद व्हावेत व नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवावा. यासाठी जायखेडा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रु ग्णांना आपआपल्या पॅथी नुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल असा सूचना वजा इशारा सरपंच शांताराम अहिरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिल्या. यावेळी गावात व्यवसाय करीत असलेल्या डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे वरिष्ठांकडून तपासणी करून घेण्यासाठी संकलित करण्यात आली.
बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील बोगस डॉक्टरचे प्रकरण उजेडात येताच तालुक्यातील गावागावात नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय करणार्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक डॉक्टर आपल्या संपादित वैद्यकीय ज्ञाना व्यतिरिक्त वेगळीच औषधोपच्यार पद्धती अवलंबत असल्याने रु ग्णाना योग्य व नियमात उपचार मिळत नसल्याचे चर्चेत आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी याची गंभीर दखल घेत,  नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे संकेत या बैठकीत दिले. यावेळी सरपंच शांताराम अहिरे, वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया, उपसरपंच सुकलाल सोनवणे, विजय बच्छाव, वसंत खैरनार, दावल सोनवणे, सचिन जगताप, हिरामण जगताप, संदेश मोरे, सुरेश अहिरे, बेबीबाई शेवाळे, अहिल्याबाई अहिरे, छाया जगताप, हर्षाली जगताप, मनीषा जगताप, हर्षाली खैरनार, कलाबाई अहिरे, रत्ना शेवाळे, चंद्रा वाघ, ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे यांच्यासह डॉ. कांतीलाल देवरे, डॉ.संदीप ब्राह्मणकार, डॉ. विशाल खैरनार, डॉ. बोरसे, डॉ. कांकरिया, डॉ. भामरे, डॉ. काकडे, डॉ. पगारे आदी वैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी डेंग्यू, स्वाईन फ्लू सारख्या गंभीर आजारांविषयी व उपाययोजनांविषयी वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांनी मार्गदर्शन केले.
डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे जमा केली असून, वरिष्ठ अधिकार्यांकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत. सर्वांना योग्यत्या सूचना देण्यात आल्या असून, नियमबाह्य काम करणार्या डॉक्टरांवर ग्रामपंचायत कायदेशीर कारवाई करणार आहे.
शांताराम अहिरे सरपंच. जायखेडा.
डॉक्टरांनी ज्या पद्धतीचे ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे, त्यानुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल.
तुषार चोरिडया, वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Out-of-date medical businesses should be closed immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.