अॅपमार्फत शाळाबाह्य मुलांची नोंदणी
By admin | Published: August 20, 2016 01:02 AM2016-08-20T01:02:33+5:302016-08-20T01:05:01+5:30
अॅपमार्फत शाळाबाह्य मुलांची नोंदणी
नाशिक : टाटा कन्स्लटंट सवर््िहसेसच्या ‘डिस्क’ इनोव्हेशन सेंटरमधील तिघा विद्यार्थ्यांनी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण अद्ययावत माहितीची नोंद घेणारे मोबाइल अॅप विकसित केले असून, या अॅपमार्फत शनिवार, दि. २० आणि सोमवार,
दि. २२ रोजी शहरातील शाळा बाह्य मुलांची नोंदणी केली जाणार आहे. सदर शोधमोहिमेसाठी मनपा शिक्षण मंडळाच्या १५० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या ५ सप्टेंबरला त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टाटा कन्स्लटंट सवर््िहसेसच्या इनोव्हेशन सेंटरमधील कलम टिमच्या अपर्णा घटे, कनक जेटली आणि श्याम किशोर यांनी शाळाबाह्य मुले शोधून त्यांची नोंद घेणारे मोबाइल अॅप विकसित केले आहे. सदर अॅपमार्फत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर जून महिन्यात ‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेमार्फत ४३१ शाळाबाह्य मुले शोधण्यात आली आणि त्यातील २०० हून अधिक मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. आता दुसरा टप्पा मनपा शिक्षण मंडळामार्फत दोन दिवस राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील अॅण्ड्राइड मोबाइल हाताळू शकणाऱ्या १५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, शहरात ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक असू शकेल अशी १८ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे सदर शिक्षक जाऊन पोहोचणार आहेत. प्रभागनिहाय सदर शोधमोहीम राबविल्यानंतर येत्या मंगळवारी (दि.२३) सर्व माहिती संकलित करून त्यातून निघणारे निष्कर्ष यावर अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांच्या गळतीची कारणे, त्यांच्या गरजा याबाबतची माहिती संकलित करून ती शासनाकडे पाठविली जाणार असल्याचेही उपासनी यांनी सांगितले. यावेळी ‘चाकं शिक्षणाची’ संस्थेचे सचिन जोशी यांच्यासह अपर्णा घटे, कनक जेटली व श्याम किशोर उपस्थित होते. (प्रतिनिधी)