कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:42 PM2020-09-14T23:42:10+5:302020-09-15T01:30:13+5:30
मांडवड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल असून दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन नांदगाव तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (लाल कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे.
मांडवड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल असून दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन नांदगाव तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (लाल कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे. मात्र लागवड झालेल्या कांदा पिकावर काही तरी अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीने बळीराजा हैराण झाला आहे. नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील शेतकरी दिगंबर अम्रुता घाडगे यांच्या शेतातील दोन एकर शेतात कांद्याचे घरचेच असलेले उळ (कांदा बी)टाकले. त्याची देखभाल करत त्याची लागवडही केली मात्र लागवड केलेले कांदा रोप अचानक आपली मान टाकत आहे. त्या रोपांची प्रतिकार शक्तीच कमी होऊन ते पुर्णपणे बसुन जात आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा लागवडीपासुन तर बाजारात नेण्यापर्यत शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.
असा येतो खर्च
साधारण एक एकराला : कांदा बियाणे तीस हजार रूपयांचे लागते. त्यानंतर कांदा लागवड सात ते आठ हजार रूपये मजूरी लागते. औषधे व खते सात ते आठ हजारापर्यंत असा एका एकरासाठी साधारण पन्नास ते साठ हजार इतका खर्च येतो. शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी भरण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते. इतकी सगळी मेहनत आणी खर्च करुन शेतातील कांदा पिक हे नष्ट होतांना दिसत आहे. तेव्हा याची दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी दिगंबर घाडगे व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
लक्ष्मीनगर येथे कांदा पिक अचानक खराब झाल्यानंतर फवारणी करतांना दिगंबर घाडगे. (१४ मांडवड)
मी स्वत: दोन एकर कांदा लागवड केली असुन माझ्या शेतातील कांदा पिक बसून जात आहे. तेव्हा शासनाने पिकाचे पंचनामे करुन भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे.-दिगंबर भोकनळ,शेतकरी
सध्याचे वातावरण हे कांदा पिकासाठी प्रतिकूल नसून शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी घाई करु नये. शिवाय गादी वाफा करुन लागवड करावी. आम्ही स्वत: पहाणी करून मार्गदर्शन करू.
जगदीश पाटील, कृषीआधिकारी, नांदगाव