डाळींबावर 'तेल्या'चा प्रादूर्भाव, जानोरीतील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 01:46 PM2020-07-09T13:46:13+5:302020-07-09T13:46:45+5:30

जानोरी : परिसरातील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Outbreak of 'oil' on pomegranate, harassment of animal farmers | डाळींबावर 'तेल्या'चा प्रादूर्भाव, जानोरीतील शेतकरी हैराण

डाळींबावर 'तेल्या'चा प्रादूर्भाव, जानोरीतील शेतकरी हैराण

googlenewsNext

जानोरी : परिसरातील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. अशा हवालदिल झालेल्या उत्पादकांना कृषी विभागाकडून डाळींब बागेत जाऊन दिलासा दिला जात आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आणि सर्वच क्षेत्र आर्थिक मंदीच्या सावटाखाली आले. आहे जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकºयाला मोठे नुकसान सोसावे लागले. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाºया डाळींब उत्पादकांना तेल्या रोगाने हैराण केले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच शेतीमाल विकता येत नाही, त्यात तेल्या रोगाने शेतकºयाची तहान-भूक पळवली आहे. जानोरी परिसरातील डाळींब बागांना तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमदाडे, शास्त्रज्ञ राकेश सोनवणे,  कृषी पर्यवेक्षक कन्होर,  कृषी सहायक मनीषा पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव काठे, उपसरपंच गणेश तिडके व गोरख तिडके, गणेश काठे, दत्तात्रेय तिडके आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Outbreak of 'oil' on pomegranate, harassment of animal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक