टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 06:59 PM2021-08-04T18:59:35+5:302021-08-04T19:00:32+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

Outbreak of taxa on tomato crop | टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर : शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडला संकटात

अनिल अलगट
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.
महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधांवर शेतकऱ्यांच्या खर्च वाढला आहे. राजापूरच्या काही भागात विहिरींना अजूनही पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरीही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा अजून पाऊस झालेला नाही. राजापुरच्या काही भागात विहिरींना पाणी आहे, तर काही भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे.

अधूनमधुन येणाऱ्या हलक्या सरींनी अस्तित्व दाखवल्याने पिकं जोमाने दिसत आहेत; पण मका, बाजरी, कपाशी या पिकांना पावसाची नितांत गरज असून दमदार पाऊस केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे भाकीत हवामान खात्याने केले होते; पण हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून राजापूर व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने छोटेमोठे नाले, बंधारे आजही कोरडेठाक आहेत.

येवला तालुक्यातील पूर्व भागाचे भवितव्य हे निसर्गावरच अवलंबून असून, येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.
दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी या भागाला टंचाई असते. दररोज ढगाळ वातावरण व थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके तरारली आहे. परंतु, विहिरींना पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, तो मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. टोमॅटो पिकावर करपा व काळा ठिपका आला असल्याने पन्नास टक्के उत्पादन घटणार आहे यात शंका नाही.
यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस होईल असा ताजा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचे हवामान खात्याकडे लक्ष आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे.

टोमॅटो पिकाला सध्या तरी बाजारभाव लक्षात घेऊन शेतकरी टोमॅटो पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या औषध फवारणीवर खर्च करीत आहे. टोमॅटो पीक.

नाशिक जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. 

Web Title: Outbreak of taxa on tomato crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.