वणीत साथीच्या आजाराचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:20+5:302021-07-16T04:12:20+5:30
दरवर्षी पावसाळा लागला की साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यावर्षी पावसाने ओढ दिली; परंतु साथीचे आजार मात्र ...
दरवर्षी पावसाळा लागला की साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यावर्षी पावसाने ओढ दिली; परंतु साथीचे आजार मात्र सुरू झाले आहेत. यात मलेरिया, चिकुन गुन्या, मलेरियासदृश आजाराने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय हे कोविडसाठी राखीव ठेवण्यात आले होते. दोन रुग्णालयांपैकी एक रुग्णालय अन्य आजारातील रुग्णांच्या उपचारासाठी खुले केले असले तरी रुग्ण मात्र खासगी रुग्णालयात उपचारास प्राधान्य देत आहेत. वणी गावातील तेली गल्ली, शिंपी गल्लीचा काही भाग, लेंडी पुरा आदी भागात या आजाराचे रुग्ण अधिक असल्याचे सांगितले जाते. रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
------- कोट ------
प्रत्येक ग्रामपंचायतीला साफसफाईवर लक्ष देण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. यात पिण्याच्या पाण्याची टाकी सफाईपासून आरोग्य बाबीबरोबरच अन्य बाबीकडे लक्ष दिले आहे.
- छाया गोतरणे, जिल्हा परिषद सदस्य
कोट...
वणी गावाची वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी काही ठिकाणी कमी पडत असलो तरी त्यात सुधारणा करण्याच्या कामास प्राधान्य देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना सफाईवर लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- विलास कड, सदस्य, ग्रामपंचायत