बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:32+5:302021-08-21T04:18:32+5:30

कवडदरा : बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, शेणीत, बेलू ...

Outbreaks of diseases on pomegranate due to changing climate | बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव

बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव

Next

कवडदरा : बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, शेणीत, बेलू परिसरात डाळिंब फळपीक तीन वर्षांपासून बदललेले हवामान, पाऊस आणि आर्द्रता, तेलकट डाग रोगाबरोबर वेगाने वाढलेला मर, पीन बोरर आणि पाकळी करपा रोग, वाढलेला खर्च, विमा कंपन्यांचा ठेंगा या समस्यांच्या चक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून, बागांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाली आहे. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या तारण्याचे काम डाळिंबने केले. अत्यंत कमी पाण्यात आणि खर्चात येणारे पीक अशी डाळिंबची ओळख झाली आहे. परिसरात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गत तीन वर्षांपासून हवामानात प्रतिकूल बदल झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढलेला पाऊस, तापमान आणि आर्द्रतेमुळे तेलकट डाग रोगाने थैमान घातले आहेच. जादा पावसाने खोलवर जमिनी भिजल्याने मर रोगाने बागांच्या बागा वाळून गेल्या आहेत. त्यात यंदा बागाच वाळून चालल्या आहेत. तेलकट डाग रोग, मर आणि पीन बोररमुळे बागा वाळून गेल्याने काढून टाकल्या जात आहेत. त्यातून राहिलेल्या बागांना सेटिंग न होणे, पाकळी करपा आणि कूज रोगाचा प्रादुर्भाव आहे.

-----------------------

कमी खर्चात आणि दहा-पंधरा फवारण्यात येणारे डाळिंब ३५ ते ४५ फवारण्या करूनही पदरात पडत नाही. कीटकनाशके आणि खतांवरील खर्च तिप्पट झाला आहे. २५ टक्के शेतकऱ्यांच्या पदरात चांगले उत्पादन पडते, तर ७५ टक्के शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही, असे तीन वर्षांपासूनचे चित्र आहे. कोरोनामुळेही दराचा फटका बसला आहे. या परिस्थितीत विमा कंपनीनेही हात वर केलेत. नवीन लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्र बागा काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळले शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.

- सतीश वाकचौरे, डाळिंब उत्पादक शेतकरी, पिंपळगाव डुकरा

Web Title: Outbreaks of diseases on pomegranate due to changing climate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.