पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यासाठी आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:10+5:302021-05-21T04:17:10+5:30
मालेगाव : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय हा असंवैधानिक व बेकादेशीर असल्याने तत्काळ रद्द ...
मालेगाव : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय हा असंवैधानिक व बेकादेशीर असल्याने तत्काळ रद्द करावा, यासाठी आरक्षण हक्क कृती समिती अंतर्गत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि अनुसूचित जाती-जमाती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष भगवान पानपाटील व विभागीय उपाध्यक्ष रमेश पवार, कार्याध्यक्ष भास्कर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब डांगळे, शहराध्यक्ष योगेश पाथरे, कार्याध्यक्ष अंकुश वाल्हे, चंदू माळी व अन्य संघटनांचे सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले.
फोटो - २० मालेगाव ४
पदोन्नतीचा बेकायदेशीर आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी भगवान पानपाटील, रमेश पवार, भास्कर शिंदे, बाळासाहेब डांगळे, योगेश पाथरे, अंकुश वाल्हे, चंदू माळी, आदींनी आक्रोश आंदोलन केले.
===Photopath===
200521\20nsk_28_20052021_13.jpg
===Caption===
पदोन्नतीचा बेकायदेशीर आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रोश आंदोलन करतांना भगवान पानपाटील, रमेश पवार,भास्कर शिंदे,बाळासाहेब डांगळे, योगेश पाथरे, अंकुश वाल्हे,चंदू माळी आदी