रुग्णांच्या कुटुंबीयांचा आक्रोश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:22+5:302021-04-22T04:15:22+5:30

रुग्णालयाबाहेर येणारा प्रत्येक आप्त अक्षरश: आक्रंदन करीत होता. कुणी तळतळाट व्यक्त करीत होते, तर कुणी आपलीच छाती बडवून घेत ...

The outcry of the patient's family! | रुग्णांच्या कुटुंबीयांचा आक्रोश !

रुग्णांच्या कुटुंबीयांचा आक्रोश !

Next

रुग्णालयाबाहेर येणारा प्रत्येक आप्त अक्षरश: आक्रंदन करीत होता. कुणी तळतळाट व्यक्त करीत होते, तर कुणी आपलीच छाती बडवून घेत होते. अशा शोकसंतप्त नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना.

-------

माझा भाऊ आठवडाभरापासून रुग्णालयात होता. बरा होत आला होता; पण ही घटना घडली आणि माझा भाऊ मला सोडून गेला. आता आम्ही काय करायचं ?

किशोर लोखंडे (मृत संदीप लोखंडे यांचे बंधू)

---------

दादा, भाऊ गेला हो आमचा. खूप चांगला होता हो माझा भाऊ. हे काय घडलं. आता घरी काय सांगू, काही कळत नाही. कुणावर अशी वाईट वेळ येऊ नये.

सुशील वाळूकर ( मृत प्रमोद वाळूकर यांचे बंधू)

-----------

माझी आई माझ्याकडे मोठ्या विश्वासाने दिल्लीहून आली होती. काही झालं तरी माझी मुलगी बघून घेईल, असे म्हणत होती. मी काही वाचवू शकले नाही हो माझ्या आईला.

पूजा सदार ( मृत आशा शर्मा यांची कन्या)

----------

दहा दिवसांपासून माझे दाजी ॲडमिट होते. मी दहा दिवसांपासून घरी न जाता इथेच रुग्णालयाबाहेर थांबून होतो. आता दोन-तीन दिवसांत त्यांना घरी नेणार होतो. आता बहिणीला काय सांगू, तेच कळत नाही.

अविनाश बिऱ्हाडे ( मृत सुनील झाल्टे यांचा शालक)

------------

आमचे व्याही हे मागील आठवड्यापासून उपचार घेत होते. इथे ऑक्सिजनची दुर्घटना घडल्याचे समजल्याने तत्काळ आलाे. मात्र, ते वाचू शकले नाहीत.

शांताराम पाटील (मृत श्रावण पाटील यांचे व्याही)

-----------

(काही प्रतिक्रिया अझर देणार आहे. त्या जोडून घ्याव्यात.)

Web Title: The outcry of the patient's family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.