त्र्यंबकेश्वर तालुक्यात शंभरावर पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:43 AM2022-01-20T00:43:04+5:302022-01-20T00:43:04+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात तिसऱ्या लाटेत त्र्यंबकेश्वर शहरात २८ तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६९ असे ९७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या सर्व ठिकाणी सज्जता करून ठेवली आहे. पण या पैकी पॉझिटिव्ह असा एकही रुग्ण येथे दाखल केलेला नाही.

कोरोना कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासून आजतागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३३०६
आजचे पॉझिटिव्ह रुग्ण आरटीपीसीआर २२
अँटिजन ०३, नगरपरिषद हद्द ९२५ (नवीन ६)
जिल्हा परिषद हद्द ग्रामीण २३८२ (नवीन १९)
आतापर्यंत डिस्चार्ज घेतलेले ३११०
आतापर्यंत मृत्यू पावलेले ९९,
गृहविलगीकरण ९७
त्र्यंबकेश्वर शहर २८ व ग्रामीण ६९
नवीन घेतलेले स्लॅब ०
याप्रमाणे कोविडची आकडेवारी असली तरी कोविड केअर सेंटर अथवा कोणत्याच कोविड रुग्णालयात रुग्ण दाखल नाहीत.
असाही अनुभव येत आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असल्याने अवघ्या सात दिवसांत रुग्ण बरा होऊन बाहेर येतो. पाचच दिवसात रुग्ण बरा होतो. तरी देखील लोकांमध्ये कोविडविषयी जी भीती आहे, ती कायम आहे. कारण त्र्यंबकचे अर्थकारण एकदम खाली आले आहे. गावात तुरळक गर्दी तर नाशिक सिटी लिंक बस अवघ्या ४/५ सिटांवर जा-ये करीत असतात. एसटी बस काही अंशी सुरू झाल्या तर त्यांना गर्दी नाही. मंदिरातदेखील फारशी गर्दी नाही. लॉजिंगवाले माशा मारीत बसले आहेत. येथील जव्हार फाट्यावरील चहाची दुकाने ग्राहकांना सुने झाल्याने दुपारी तीन वाजताच घरी जातात. सहसा परगावचे लोक कोणी येत नाहीत. स्थानिक व परिसरातील गर्दीच तेवढी दिसत आहे.