दिवसभरात १ हजार ४०० रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:32 AM2020-09-16T01:32:55+5:302020-09-16T01:34:02+5:30
जिल्ह्यातील मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे नव्याने १ हजार १०७ रुग्ण आढळून आले. शहरात ८१२ नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात केवळ २६२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ५५ हजार ९४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४६६ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
नाशिक : जिल्ह्यातील मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे नव्याने १ हजार १०७ रुग्ण आढळून आले. शहरात ८१२ नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात केवळ २६२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ५५ हजार ९४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४६६ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रु ग्ण दगावले होते.
शहरातील ९ , ग्रामीण ४ मालेगावात ५ रु ग्ण मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा १ हजार ९१ वर पोहोचला आहे. नाशिक शहरात आतापर्यंत ६०८, तर ग्रामीणमध्ये ३२५ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ९९ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९७८ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ६८० रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.