1600 रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:10 AM2020-09-20T01:10:13+5:302020-09-20T01:10:35+5:30

जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१९) नव्याने १ हजार ३८७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यापैकी शहरात ८७९ रुग्ण सापडले तर ग्रामिण भागात ४४२ आणि मालेगावात ४७ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६२ हजार ५०७ इतकी झाली आहे.

Over 1600 patients overcome corona | 1600 रुग्णांची कोरोनावर मात

1600 रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १६ बळी । दिवसभरात कोरोनाचे तेराशे नवीन रुग्ण

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१९) नव्याने १ हजार ३८७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यापैकी शहरात ८७९ रुग्ण सापडले तर ग्रामिण भागात ४४२ आणि मालेगावात ४७ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६२ हजार ५०७ इतकी झाली आहे. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी शहरात रुग्ण कमी आढळले. जिल्ह्यात दिवसभरात १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच दिवसभरात १ हजार ६४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. तसेच चार दिवसांपासून कोरोनाबधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्यामध्ये शहरातील ६, ग्रामिण-८,मालेगावातील२रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १५५वर पोहचला आहे. दिवसभरात जिल्हयात २ हजार ४० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
५१ हजार रुग्णांची मात
नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१हजार २६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ३६ हजार २३७, ग्रामिण मधील १२ हजार १२६ तर मालेगावातील २ हजार ६४५, जिल्ह्यबाहेरील २५३ रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १ लाख ५६ हजार ४९४ लोक निगेटिव्ह आले आहेत. एकूण ६२ हजार ५०७रुग्ण जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पॉझिटिव्ह आले होते. यापैकी ४२ हजार ७६६ रुग्ण नाशिक शहरात आहे. ग्रामिण मध्ये १५ हजार ९९२ रुग्ण आहेत.
नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी बाळगणे गरजेचे
एकुणच शहरासह जिल्ह्यात संशयित रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावण्यासह सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

Web Title: Over 1600 patients overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.