जिल्ह्यात १९०० रु ग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:27 AM2020-09-21T01:27:49+5:302020-09-21T01:35:33+5:30
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १ हजार ९४० रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १ हजार ९४० रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
रविवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शहरातील ६, ग्रामीण ६, मालेगावातील ६
रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १७३ वर पोहचला आहे. दिवसभरात जिल्हयात २ हजार १०४ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
जिल्ह्याची स्थिती दृष्टिक्षेपात
नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार २०१ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक मनपा हद्दीतील ३७ हजार ५२१, ग्रामीणमधील १२ हजार ७४६ तर मालेगावातील २ हजार ६६७, जिल्ह्याबाहेरील २५३
रु ग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १ लाख ६१ हजार ४२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
येवला शहरासह तालुक्यातील १६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर अंगणगाव येथील पुरुषाचा अँटिजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ४१ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. एकूण १६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या ६२६ झाली असून, आजपर्यंत ५१६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर आत्तापर्यंत ४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६८ आहे.
निफाड तालुक्यात नवीन ५९ नवे कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आले आहेत. त्यात ओझर येथे १५, पिंपळगांव बसवंत येथे ११, चांदोरी येथे ८, उगाव येथे ६, सायखेडा येथे ३, निफाड, विंचूर, टाकळी विंचूर , खेरवाडी, येथे प्रत्येकी २, कोकणगाव , उंबरखेड, कोळवाडी, करंजगाव, पिंपळगाव निपाणी, गोंडेगाव, शिंगवे , डोंगरगाव येथे प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.