2 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:09 AM2020-09-25T00:09:28+5:302020-09-25T01:27:51+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२४) कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे समोर आले; मात्र जिल्ह्यात 24 रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांचा आकडा आता 1 हजार 249 इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 176 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले.
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२४) कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे समोर आले; मात्र जिल्ह्यात 24 रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांचा आकडा आता 1 हजार 249 इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 176 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले.
कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना घरातच विलगिकरण करण्यात आले आहे. गुरुवारी शहरात १ हजार ६५४ रुग्ण, ग्रामीणमधील ५८७, मालेगावमधील ५७ व परजिल्ह्यातील १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच शहरात नव्याने ७८६, ग्रामीणमध्ये ५८२, मालेगावला ५५ व जिल्ह्यबाहेरील १३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, गुरुवारी २४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरात १० तर ग्रामीणमध्ये १२ व मालेगाव आणि परजिल्ह्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण दगावला. त्याचप्रमाणे शहरात नव्याने १ हजार ७५६, मालेगावला २९ आणि ग्रामीणमध्ये ८६ संशयितांना दाखल करण्यात आले. तसेच १ हजार ८८४ संशयितांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तर जिल्हयात गुरुवारी सायंकाळपर्यंत ७ हजार २८२ बाधितांवर उपचार सुरु होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण बाधितांपैकी अवघ्या १० टक्के बाधितांवरच उपचार सुरु आहे.
मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. कोरोनाबधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात संशयित रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला आहे..सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावण्यासह सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.
--