दोन लाख ६० हजारांवर रुग्णांनी हरवले कोरोनाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:32+5:302021-04-29T04:11:32+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.
कोरोना सर्वाधिक थैमान घालत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कोरोनातून बरे होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात शंभर बाधितांपैकी किमान ८४ बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ६१ हजार ४८२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्य:स्थितीत ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत तीन हजार ३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इन्फो
जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी नाशिक शहरात
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक एक हजार ६६६, चांदवड एक हजार ६१२, सिन्नर दोन हजार १२, दिंडोरी एक हजार ३८३, निफाड तीन हजार ६१८, देवळा एक हजार २७३, नांदगाव ८९९, येवला ७७३, त्र्यंबकेश्वर ३९८, सुरगाणा ३५९, पेठ २००, कळवण ७८०, बागलाण एक हजार ६५४, इगतपुरी ३६८, मालेगाव ग्रामीण ८२१ असे एकूण १७ हजार ८१६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २६ हजार ६८५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ७२६, तर जिल्ह्याबाहेरील २४७ असे एकूण ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाखांवर रुग्ण आढळून आले आहेत.
इन्फो
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतेय
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत आहे. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये ८२.३३ टक्के, नाशिक शहरात ८४.८७ टक्के, मालेगावमध्ये ८२.३३ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.९९ इतके आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपर्यंत घसरून आता थोडेसे वर जाऊ लागले असून, हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.
----------------------
ही डमी आहे.