जिल्ह्यात साडेचार हजार बाधितांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:41 AM2021-04-26T01:41:43+5:302021-04-26T01:42:23+5:30

जिल्ह्यात काेरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिवसभरात ४,७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, बळींनी ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ३३११ वर पोहोचली. कोरोनाबाधितांच्या संख्या पुन्हा साडेपाच हजारांचा आकडा ओलांडून ५६७५ पर्यंत पोहोचली आहे.

Over four and a half thousand victims in the district overcame Corona | जिल्ह्यात साडेचार हजार बाधितांची कोरोनावर मात

जिल्ह्यात साडेचार हजार बाधितांची कोरोनावर मात

googlenewsNext
ठळक मुद्देसंसर्ग : ५६७५ नवे रुग्ण; ३९ बळी 

नाशिक : जिल्ह्यात काेरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिवसभरात ४,७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, बळींनी ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ३३११ वर पोहोचली. कोरोनाबाधितांच्या संख्या पुन्हा साडेपाच हजारांचा आकडा ओलांडून ५६७५ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात मनपा क्षेत्रामध्ये २७२७, तर ग्रामीणला २७०९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १२१ व जिल्हाबाह्य ११८ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला २६ असा एकूण ३९ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. पंधरवड्यापासून मृतांची संख्या तीसहून अधिक राहिली आहे. तरीदेखील नागरिक निर्बंधांबाबत दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे चित्र जाणवत आहे.
उपचारार्थी 
थेट ४८ हजारांवर
जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४८ हजारांवर जाऊन एकूण ४८५७१ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यात २७ हजार ७९७ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १८ हजार ६५५ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ८३६ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २८३ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Over four and a half thousand victims in the district overcame Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.