तब्बल अडीच लाख रुग्णांनी  केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:04 AM2021-04-26T01:04:51+5:302021-04-26T01:05:53+5:30

जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.

Over two and a half lakh patients overcame coli coli | तब्बल अडीच लाख रुग्णांनी  केली कोरोनावर मात

तब्बल अडीच लाख रुग्णांनी  केली कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देदिलासा : जिल्ह्याचा कोरोनामुक्तचा दर पुन्हा ८३ टक्क्यांकडे

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.
कोरोना सर्वाधिक थैमान घालत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कोरोनातून बरे होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात शंभर बाधितांपैकी किमान ८३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त  होऊन आपापल्या  घरी परतत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या ३ लाखांवर गेली असली तरी त्यातील  दोन लाख ५२ हजार ११२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्य:स्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार ३३१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  
जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी नाशिक शहरात
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक एक हजार ६२९, चांदवड एक हजार ७७५, सिन्नर एक हजार ८२२, दिंडोरी एक हजार ६०६, निफाड तीन हजार ५१३, देवळा एक हजार ११०, नांदगाव ९२४, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ४५०, सुरगाणा ३८२, पेठ १९७, कळवण ८४७,  बागलाण एक हजार ६९२, इगतपुरी ३७३, मालेगाव ग्रामीण ७३६  असे एकूण १७  हजार ७६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २८ हजार १२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ७१८, तर जिल्ह्याबाहेरील २१४  असे एकूण ४७  हजार ७०४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाखावर  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी वाढतेय
n    जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीणमध्ये ८१.४५  टक्के, नाशिक शहरात ८३.५९ टक्के, मालेगावमध्ये  ८२.२६  टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९३  इतके आहे. 
n    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपर्यंत घसरून आता थोडेसे वर जाऊ लागले असून, हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील दोन लाख  ५२  हजार ११२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून,  सद्य:स्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार ३३१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: Over two and a half lakh patients overcame coli coli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.