पेठ तालुक्यातील 51 बाधीतांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:05 PM2020-10-11T22:05:13+5:302020-10-12T01:13:26+5:30
पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पेठ तालुक्याची लोकसंख्या साधारण 1 लाख 35 हजाराच्या जवळपास असून 200 गाव वस्त्या आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात 85 रु ग्णाना कोरोनाची लागन झाल्याची नोंद असून 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 कोरोना बाधीत रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार 31 बाधीत रु ग्ण उपचार घेत असून बाधीत रु ग्णांच्या संपर्कातील 20 जणाचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली आहे. पेठ येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणार्या रु ग्ण व नेमणूक कर्मचारी यांना योग्य सुविधा पुरवाव्यात असे प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून सुचवण्यात आले असून नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता योग्य नियमांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संदिप भोसले यांनी केले आहे