१ हजार ५८० रु ग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:06 AM2020-09-15T02:06:46+5:302020-09-15T02:07:05+5:30

जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ५८० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

Overcoming Corona by Rs 1,580 | १ हजार ५८० रु ग्णांची कोरोनावर मात

१ हजार ५८० रु ग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाची कसरत : ९ बळी; १ हजार ३१७ नवे रु ग्ण; खबरदारीची गरज

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ५८० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा सतत वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रु ग्ण दगावले. नऊ रु ग्णांपैकी शहरातील ५ , ग्रामिण-3 मालेगावात 1 रु ग्ण मृत्युमुखी पडला. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा 1 हजार 73 वर पोहचला आहे. सोमवारी शहरात सोमवारी 876, ग्रामिणमध्ये 373 मालेगावात48 जिल्ह्यबाहेरील 20 रु ग्ण कोरोनाबधित आढळून आले. नाशिक शहरात आतापर्यंत 599 तर ग्रामिणमध्ये 321 रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्हयात 1 हजार 835 संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी 1हजर 453 रु ग्ण केवळ नाशिक शहरातील आहे. एकुणच शहरात संशियत रु ग्णांसह कोरोनाबाधित रु ग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे..सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क, सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वाढती रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 787 रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्हयात आतापर्यंत 43 हजार 214
रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच 10 हजार 516 रु ग्ण उपचार घेत आहेत.1 हजार 460 नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.
येवल्यात २१ अहवाल पॉझिटिव्ह
येवला : शहरासह तालुक्यातील 21 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून शहरातील 51 वर्षीय बाधित मिहलेचा जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर 12 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. प्रलंबित 75 स्वॅब पैकी 21 अहवाल पॉझीटीव्ह तर इतर निगेटीव्ह आले आहेत. नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर मधून 3 तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून 9 असे एकूण 12 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 541 झाली असून आजपर्यंत 409 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 39 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित रूग्ण संख्या 93 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
सिन्नरमध्ये ६५ बाधित
सिन्नर : तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील सोमवारी एकाच दिवसात ६५ कोरोनाबधित आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १८७२ झाली आहे. त्यात १४६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर मृत्यू संख्या ५४ झाली आहे. शहरात १७ तर ग्रामीण भागात ४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

Web Title: Overcoming Corona by Rs 1,580

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.