आवर्तनासह पिण्याच्या पाण्याचे संकट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:16+5:302021-09-12T04:17:16+5:30

उमराणे : येथील ब्रिटिशकालीन परसूल धरण भरल्याने शेतीसाठीच्या आवर्तनासह उमराणे व परिसरातील चार ते पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ...

Overcoming the crisis of drinking water with rotation | आवर्तनासह पिण्याच्या पाण्याचे संकट दूर

आवर्तनासह पिण्याच्या पाण्याचे संकट दूर

Next

उमराणे : येथील ब्रिटिशकालीन परसूल धरण भरल्याने शेतीसाठीच्या आवर्तनासह उमराणे व परिसरातील चार ते पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरण भरल्याने जि.प.चे माजी सदस्य प्रशांत देवरे व ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या वतीने जलपूजन करण्यात आले आहे. सन १८८५ साली ब्रिटिश राजवटीत उमराणे येथे परसूल धरण बांधण्यात आले आहे. सुमारे १३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या धरणाच्या पाण्यावर येथील शेतीसाठी दोन आवर्तन सोडले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उमराणे, तिसगाव, दहिवड, खारीपाडा आदी गावांसाठी आरक्षित कोट्यातून पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील परसूल धरण सर्वांसाठी उपयुक्त असल्याने दरवर्षी हे धरण भरण्यासाठी नागरिकांना आतुरता लागून असते. चालुवर्षी पावसाळा सुरू होऊन तीन ते चार महिने उलटले तरीही उमराणेसह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस नसल्याने हे धरण भरणार की नाही याबाबत चिंता व्यक्त होत होती. परंतु धरणाच्या आजुबाजूला डोंगर कठाड्यांचा भाग असल्याने तेथून पाण्याचा स्रोत वाढल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

---------------

रब्बीसाठी आशा पल्लवित

धरण भरल्याने परसूल नदीला पाणी आले असून उमराणेसह परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच पेयजल योजना असलेल्या गावांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जलपूजनाप्रसंगी ग्रा.पं.चे उपसरपंच विश्वनाथ देवरे, शेतकी संघाचे माजी संचालक दिलीपनाना देवरे, विद्यमान अध्यक्ष संदीप देवरे, बाजार समितीचे प्रशासकीय संचालक बाळासाहेब देवरे, ग्रा.पं. सदस्य भरत देवरे, सचिन देवरे, ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे, भिला देवरे,राहुल देवरे आदिंसह बहुतांशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

येथील परसूल धरणावर उमराणेसह परिसरातील चार ते पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने हे धरण लवकरात लवकर भरणे अपेक्षित असते. चालूवर्षी उमराणेसह परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरीही हे धरण लवकर भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

- प्रशांत देवरे,माजी जि.प. सदस्य

------------------

परसूल धरणाचे जलपूजन करताना प्रशांंत देवरे, दिलीप देवरे,संदीप देवरे व इतर (११ उमराणे परसूल)

110921\11nsk_7_11092021_13.jpg

११ उमराणे परसूल

Web Title: Overcoming the crisis of drinking water with rotation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.