‘टीका-टाका’वर टोटल फुटबॉलची मात

By admin | Published: June 15, 2014 06:32 PM2014-06-15T18:32:31+5:302014-06-15T18:34:18+5:30

‘टीका-टाका’वर टोटल फुटबॉलची मात

Overcoming Total Football on 'Tika-Puta' | ‘टीका-टाका’वर टोटल फुटबॉलची मात

‘टीका-टाका’वर टोटल फुटबॉलची मात

Next

आनंद खरे

ब्राझीलच्या शिलेदारांनी यशस्वी सुरवात पाहिल्यानंतर उत्सुकता लागली होती ती स्पेन-नेदरलॅण्ड या सामन्याची. गेल्या विश्वचषकात टायटलसाठी भिडणाऱ्या स्पेन-नेदरलॅण्ड यांच्या ब गटातील हा मागच्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचाच अ‍ॅक्शन रिप्ले म्हणून स्पेन गत सामन्याप्रमाणे आपली कामगिरी राखण्यात यशस्वी होतो की नेदरलॅण्ड मागील विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्यात यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष होते. स्पेनच्याकामगिरीचा विचार केल्यास २००८ च्या युराचषकाचे विजेतेपद २०१०चे विश्वविजेतेपद, २०१२ च्या युरो चषकाच्या विजेतेपदाचा सिलसिला टिकवून ठेवला. तसेच २०१३ च्या कॉन्फडरेशन कप स्पर्धेचे उपविजेतेपद अशी कामगिरी करून स्पेनने आपले पहिल्या क्रमांकाचे रॅकिंग टिकविण्यात यश मिळविले आहे. या तुलनेत नेदरलॅण्डची कामगिरी थोडीशी घसरलेली आहे. ३ नंबर रॅकिंगवरून त्यांची चक्क १५व्या नंबरपर्यंत रॅकिंग घसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्यामुळे या सामन्यात स्पेनचेच पारडे जड वाटत होते. स्पेननेही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत तशी सुरवात करत सामन्यात स्पेनचेच पारडे जड वाटत होते. स्पेननेही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत तशी सुरवात करत नेदरलॅण्डच्या गोलपोस्टवर हल्ले करून २७व्या मिनिटाला पेनल्टीही मिळवली आणि झवी अलोन्साने ती कारणी लावत स्पेनला १ गोलची आघाडी मिळवून दिली. अर्थात स्पेनचा मागील विश्वचषकातील इतिहास बघता स्पेनने १ गोल्या आघाडीवर उपउपांत्य, उपांत्य आणि अंतिम सामनाही जिंकला होता. त्यामुळे स्पेनची ही आघाडी पुन्हा स्पेनला या विश्वचषकात ३ गुण मिळवून देईल असे वाटून गेले. मात्र पहिला हाफ संपण्याच्या १ मिनिट आधी व्हॅन पर्सीचा हेडरने स्पेनचे ठोके चुकवले. स्पेनचा गत विश्वविजेता कर्णधार - गोली इकार कॅसिएस यावेळी चकला आणि पर्सीने नेदरलॅण्डला बरोबरीत नेले. मध्यंतरानंतर तर चित्रच बदलले. आपण एखाद्या बलवन संघाच्या सरावासाठी स्थानिक क्लबच्या संघाला खेळवतो आणि त्यांच्यावर जशी गोलची बरसात होते तशा प्रकारे नेदरलॅण्डच्या या आॅरेंज आर्मीने एक-एक गोलचा धडाकाच सुरू केला आणि टोटल फुटबॉल काय असतो याची नजाराच पेश करत या आॅरेंज आर्मीने टीका-टाका शैलीचा अवलंब करणाऱ्या स्पेनचा लाल भडक रंग पुरता फिका करून टाकला. गेल्या विश्वचषकात १ गोलची आघाडी यशस्वीपणे टिकवून धरणारा कर्णधार - गोली कॅसिएस तसेच बचावपटू झावी हर्नीडेज, सर्जीओ रामोस झावी अलान्सो हे सर्वच निप्रभ झाले. मॅन्चेस्टर युनायटेडचा स्टार रॉबीन व्हॉन पर्सी याची गोलपोस्टसमोरील मुसंडी आणि बायन म्युनीकचा अर्जेन रॉबेन यांचा डाव्या पायाची हुकुमत तसेच चेंडूला पुढे नेत ३-४ बचावपटुंना चकवून जागा तयार करून गोल करण्याच्या त्याच्या क्षमतेला कोणाकडेच उत्तर नव्हते. अर्जेन रॉबेनला तर सलामच केला पाहिजे. कारण कॅन्सरसारख्या रोगावर मात करून आपल्या मनाच्या ताकदीवर त्याचे फुटबॉलच्या विश्वावर मिळविलेली हुकुमत बघता जिद्दीपुढे सर्वकाही गौण आहे याचीच प्रचिती येते. स्पेनची ५-१ अशी एवढी मोठी हार म्हणजेच फुटबॉललाच दुसरे नाव असणाऱ्या सॉकरचा एक शॉकच म्हटला पाहिजे. १९६३ नंतरचा स्पेनचा हा सर्वात मोठा पराभव आहे. अर्थातहा साखळीतील पहिलाच सामना असल्यामुळे स्पेन हा पराभव लक्षात ठेवून पुन्हा आपल्या वैभवाला साजेशी कामगिरी करू शकतो. या गटातील चीलीने आॅस्ट्रेलियाला पराभूत करून मिळविलेला विजय हा अपेक्षितच होता, मात्र त्यामुळे आता १९ तारखेला चीली आणि स्पेन हा सामना स्पेनसाठी करो या मरो अशा परिस्थितीत आलेला आहे. याआधी झालेल्या अ गटातील मेक्सिको - कॅमेरून सामन्यात मेक्सिकोने अफ्रिकन टायगर्सला १-० असे पराभूत करून प्रथमच अफ्रिका संघावर विजय साजरा केला आहे. शिवाय ब्राझीलपाठोपाठ गटातून बाहेर पडण्यासाठीचे सकारात्मक पाऊल टाकले आहे. आज होणाऱ्या चार लढतीत ई या गटात सर्वांनाच समान संधी असल्यामुळे स्वीत्झलॅण्ड-इक्वाडोर आणि फ्रान्स-हुंडारुर याची फारशी चर्चा नाही. मात्र फ या गटातील अर्जेंटीना-बोस्निया व हर्जीगोव्हीना हा सामना मात्र लक्षवेधी ठरणार आहे. ब्राझीलच्या नेमारने आपली जादू पेश केल्यानंतर आता अर्जेंटीनाच्या लिओनेल मेस्सीची जादू बघण्यासाठी फुटबॉलप्रेमी आजची पहाट (३.३० वा) कारणी लावणार यात शंका नाही. बोस्निया-हर्जीगोव्हीना हा संघ प्रथमच या विश्वचषकात सहभागी होत आहे. संघ नवीन असला तरी संघातील खेळाडू नवीन नाहीत. १९९४ साली युगोस्लाव्हीयापासून वेगळा झालेला हा नवीन देश आहे आणि युगोस्लाव्हीयाचा विचार करता या देशात फुटबॉल हा फार पूर्वीपासून रुजलेला आहे. त्यामुळे अर्जेंटीना-बोस्निया हर्जीगोव्हीना हा सामनाही फुटबॉलप्रेमींची पहाट कारणी लावणाराच ठरेल यात शंका नाही.

Web Title: Overcoming Total Football on 'Tika-Puta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.