मजुरांअभावी शेतकºयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 10:17 PM2017-08-04T22:17:42+5:302017-08-05T00:23:27+5:30

दहा दिवस सलग सुरू आलेल्या पावसाने तीन - चार दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र एकाच वेळी सर्व शेतकºयांची कामे सुरू झाल्याने परिसरात शेतमजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 Overcrowding of farmers due to laborers | मजुरांअभावी शेतकºयांची धावपळ

मजुरांअभावी शेतकºयांची धावपळ

Next

सायखेडा : दहा दिवस सलग सुरू आलेल्या पावसाने तीन - चार दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र एकाच वेळी सर्व शेतकºयांची कामे सुरू झाल्याने परिसरात शेतमजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गोदाकाठ परिसरात गेल्या दहा ते बारा दिवस पावसाने जोर धरला होता. यंदाच्या पावसात सरासरी सर्वाधिक पाऊस या दिवसात झाला. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले होते. या नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी आल्या. शेतीसाठी उपयुक्त ठरेल असा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे काही ठिकाणी बेभरवशावर शेतात पेरणी केली होती तर काही ठिकाणी काळी कसदार जमीन असलेल्या शेतात ओलावा गेला नसल्याने पेरणी केली नव्हती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे चिन्ह दिसत होते; मात्र मागील काही दिवसात चांगला पाऊस पडला आणि पेरणीचे संकट टळले. पावसामुळे शेतीची कामे रखडली होती. रिपरिप पावसामुळे पिकातील तणांची वाढ झाली. पीक उभे असले तरी वाढत्या तणाने शेतकरी त्रस्त झाले होते. पावसाने उघडीप दिली आणि एकच वेळी निंदणीची कामे आली आहेत त्यामुळे मजुरांचा तुडवडा जाणवू लागला आहे. निंदणीबरोबरच टमाटा बांधणी, ऊस लागवड, द्राक्षबागेची शेंडे काढणी, नवीन द्राक्ष कलम करणे असे अनेक कामे एकाच वेळी आल्याने मजुरांचा तुडवडा जाणवत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title:  Overcrowding of farmers due to laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.