थकीत कांदा बिल उत्पादकांनी कृउबा सचिवाला दोन तास डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:54 PM2018-12-12T17:54:02+5:302018-12-12T17:54:13+5:30
मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांचे थकीत बिल हॉटेल व राजकीय पुढाºयांच्या घरी वाटप केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांचे थकीत बिल हॉटेल व राजकीय पुढाºयांच्या घरी वाटप केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ५० टक्के रक्कम अदा केली जात असताना शेतकºयांना शंभर टक्के पैसे दिल्याची पावती (तिकीट लावून) करुन घेत जात असल्याच्या निषेधार्थ व शेतकºयांचे थकीत बिल तातडीने अदा करावेत या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी व शेतकºयांनी मालेगाव कृउबाचे सचिव अशोक देसले यांना दोन तास डांबुन ठेवले होते. शेतकºयांना उर्वरित पैसे लवकर अदा केले जातील असे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर जय भोलेनाथ ट्रेडर्सचे व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकºयांचे थकीत कांदा विक्रीचे २ कोटी १९ लाख रुपये घेणे होते. त्यापैकी सूर्यवंशी यांनी पिंपळगाव व इतर व्यापाºयांना विकलेल्या कांद्याचे पैसे वसुल करण्यात आले आहे. तसेच त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करुन आलेले ६० लाख रुपये बाजार समितीकडून वाटप करण्यात आले आहे. काही शेतकºयांना पैसे देण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीकडून ५० टक्के रक्कम अदा केली जात आहे. मात्र सदरची रक्कम बाजार समितीच्या कार्यालयात न वाटप करता हॉटेल व राजकीय पदाधिकाºयांच्या घरी शेतकºयांना अदा केली जात आहे. तसेच ५० टक्के रक्कम देताना शंभर टक्के पैसे मिळाल्याचे हमीपत्र शेतकºयांकडून लिहून घेतले जात आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी बुधवारी मालेगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सचिव अशोक देसले यांना डांबुन ठेवले होते. कृउबाच्या प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शेखर पगार, शशिकांत वाघचौरे, संजय दुटासरे, ललीत पाटील, अंकुश शेवाळे आदिंसह शेतकरी सहभागी झाले होते.